गणपती बाप्पां :- आराध्य दैवत ते सकल कलेंचा अधिपती

गणपती बाप्पां :- आराध्य दैवत ते सकल कलेंचा अधिपती

श्री गणेशांना मुख्यतः बारा नावांनी ओळखले जाते. तसेच चौदा विद्यां व चौसष्ट कलेंची देवता (अधिपती) असे म्हटले जाते. प्राचीन कालापासून भारतात श्री गणेश पुराण व श्री मुद्रलपुराण या हिंदू ग्रंथांमध्ये श्री गणपती देवतेची माहिती आढळून येते .पुराणात श्री गणेश हे शंकरपार्वतींचा पुत्र असल्याचे सांगितले जाते. गणेश या शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.
पुराणातील वरील साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचाही उल्लेख आहे. तसेच महाभारत या ग्रंथाच्या लिखाणाचे काम हि श्री गणेशांनी केले आहे म्हणजेच श्री गणेश हे या ग्रंथाचे लेखनिक होते.

पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती,विघ्नविनाशक,विघ्नराज वा विघ्नेश्वर म्हणून उल्लेख आढळतो. या शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. तसेच श्री गणेशांना बारा नावांनीही ओळखले जाते. वक्रतुंड, एकदंत, कृष्णपिंगाक्ष, गजवक्र, श्री लंबोदर, विकट, विघ्नराजेंद्र, धुम्रवर्ण, भालचंद्र, श्री विनायक, गणपती, श्री गजानन अशी अनुक्रमे बारा नावे आहेत.

Shri Ganesh/बारा नावांची माहिती पुढीलप्रमाणे :-

वक्रतुंड म्हणजे “ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे असा. सोंडेमुळे श्री गणेशाचे तोंड थोडे वक्र दिसते त्यामुळे त्याला वक्रतुंड हे नाव पडले आहे.

एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुराम व श्री गणेश यांच्या युद्धात परशुरामांनी गणपतीचा एका दातावर प्रहार केला त्यामुळे श्री गणेशाचं एक दात (सुळा )मोडला. दुसऱ्या कथेनुसार कैलास पर्वतावर रावणाला श्री गणेशांनी येण्यापासून अडवले त्यामुळे रावणाने चिडून एका दातावर प्रहार करून दात मोडला. त्यामुळे श्री गणेशांना एकदंत हे नाव पडले.

कृष्ण पिंगाक्ष या नावाचा अर्थ तो असा, कृष्ण म्हणजे सावळा (काळा) व पिंगाक्ष म्हणजे पिंगट रंगाचे डोळे असणारा असा तो श्री गणेश होय.

गजवक्र नावाचा अर्थ तो असा, गज म्हणजे हत्ती व वक्र म्हणजे वाकडे तोंड असणारा म्हणजेच हत्तीसारखे वाकडे तोंड असणारा तो श्री गणेश म्हणजे गजवक्र होय.

श्री लंबोदरअथवा महोदर शब्दांचा अर्थ लंब म्हणजे लांबडे वा लांब व उदर म्हणजे (पोट) असणारा असा तो श्री गणेश म्हणजे लंबोदर होय. आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात.

विकट शब्दाचा अर्थ कामासुराचा वध करताना श्री गणेशांनी जे विराट रूप धारण केले म्हणून असा तो विकट होय. विकट सूर्याचे प्रतीक आहे. वाहन मयूर

विघ्नराज शब्दाचा अर्थ तो असा, विघ्न म्हणजे संकट व राज म्हणजे राजा, देवांवर व मनुष्यांवर आलेले संकट दूर करणारा तो श्री गणेश म्हणजे विघ्नराज होय. मनुष्याच्या लोभाचा नाश श्री विघ्नराज करतो.

धुम्रवर्ण शब्दाचा अर्थ अहंकारासूर अथवा अभिमानसूर नावाच्या राक्षसाचा वध केला. त्याकरिता श्री गणेशाना आठव्या अवतारात धूम्रवर्णाचे रूप घेतले. या धुम्रवर्नाचे रूप राखाडी रंगाचे असलेने श्री गणेशाना धुम्रवर्ण या नावाने ओळखले जाते. या अवतारात श्री गणेशांनी संपूर्ण मानव जातीला दुःख व संकटातून वाचवले.

भालचंद्र शब्दाचा अर्थ तो असा, भाल म्हणजे कपाळ आणि चंद्र म्हणजे चंद्र. याचाच अर्थ श्री गणेशांनी कपाळावर चंद्र धारण केले असल्याने श्री गणेशाना भालचंद्र असेही म्हणतात. भालचंद्र गणपतीचे मंदिर लिंबागणेश हे बीड जिल्ह्यात आहे. चंद्राने गणपतीचा उपहास केल्यावर, श्री गणेशांनी त्याला शाप दिला. त्या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने या ठिकाणी गणेशाची प्रार्थना केली.

विनायक या नावाचा अर्थ भक्तांना मार्गदर्शन करणारा अथवा अडथळे दूर करणारा, भक्तांचे दुःखात मार्गदर्शन करून त्यांची दुःखे दूर करणारा तो श्री गणेश म्हणजेच श्री विनायक होय.

गणपती चा अर्थ तो असा, ‘गणांचा ईश’ किंवा ‘गणांचा पती’ असा होय. शिव आणि पार्वतीचे सेवकाना ‘गण’ असे म्हणतात व त्या गणांच्या मुखियाला पती, किंवा स्वामी किंवा राजाअसे म्हणतात. त्यामुळे गणपती म्हणजे गणांचा स्वामी किंवा गणांचा राजा/पती अस तो श्री गणेश होय.

गजानन शब्दाचा अर्थ तो असा, गज म्हणजे हत्ती व आनन म्हणजे तोंड.त्यामुळे हत्तीचे तोंड असलेला तो श्री गणेश म्हणजे गजानन होय. मनुष्याच्या लोभाचा नाश श्री गजानन करतो. या बारा नावां व्यतिरिक्त इतर हि १०८ नावांनीही श्री गणेशाना ओळखले जाते.

Ganesh Vidya/चौदा विद्यांची नांवे पुढीलप्रमाणे :-ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, धर्मशास्त्र, पुराणे, ज्योतिष, शिक्षा, व्याकरण, छंद, निरुक्त, कल्प, न्याय, मीमांसा, तसेच काही विद्वानांच्या मते श्री गणेशांना या चौदा विद्यां व्यतिरिक्त जलतरण, रसायन, ब्रह्मज्ञान, वैद्यक, नाट्य, धनुर्विद्या यांसारख्या विद्यांही अवगत होत्या.

Ganpati Kala/चौसष्ट कलेंची नांवे पुढीलप्रमाणे :-

१) लिपिचे ज्ञान २) कामशास्त्र ३) दुरोदर ४) आगम ५) काव्य करणे ६) इतिहास ७) अलंकार ८) नाटक ९) गायन १०) कवी११) लिपिकर्म १२) मल्लशास्त्र १३) रत्नशास्त्र १४) गज-रथ-अश्व कौशल्य १५) शाकुन १६) सामुद्रिक १७) वाचन १८) गणन १९) व्यवहार २०) स्वरशास्त्र२१) बागाईत २२) गंधवाद २३) धातुवाद २४) बिलवाद २५)वाक स्तम्भम २६)वायूस्तंभन २७) जलसंस्तम्भ २८) अग्निसंस्तम्भ २९) रससंबंध ३०) सूपशास्त्र ३१) मोहन ३२) वशीकरण ३३) आकर्षण ३४) मारण ३५) परकायाप्रवेश ३६) वाक्सिद्धी ३७) पादुकासिद्धी ३८) उच्चाटन ३९) विद्वेषण ४०) कलवंचन
४१) अंजन ४२) स्वरवंचन ४३) गुटिकासिद्धी ४४) कर्म ४५) ऐन्द्रजालिक ४६) वाक्सिद्धी ४७) पारदृष्टिवंचन ४८) चित्रक्रिया ४९) लेहक्रिया ५०) मंत्रऔषधी५१) वेणुक्रीया ५२) अदृश्यकरण ५३) मृगयाविधी ५४) मृत्क्रिया५५) वाणिज्य ५६) दंतीकरण ५७) अम्बरक्रिया औषधक्रिया ५८) चर्मक्रिया ५९)अश्मक्रिया ६०)
६१) कृषी ६२) पशुपालन ६३) युद्ध कौशल्य ६४) आसनकर्म

वरील सर्व विद्या व कलांचा संबंध बुद्धी आणि ज्ञानार्जनाशी आहे आणि त्यामुळे श्री गणेशांना बुद्धीची देवता म्हटले जाते, जो कोणी यातील एका जरी कलेचा अभ्यास करून संपूर्ण ज्ञानार्जन ग्रहण करेल त्याला श्री गणेश नेहमीच त्या कलेत विद्वान बनवतात. तसेच वरील विद्या व कलांचा जो कोणी आदर करतो, त्यांना श्री गणेश नेहमीच आशीर्वाद देतात असे मानले जाते. यास्तव या कलांचा उपयोग मानवाला विविध प्रकारे ज्ञान आत्मसात करणे आणि आनंद मिळवण्यासाठी केला पाहिजे. श्री गणेशांचे कला आणि विद्येची देवता म्हणूनही गणेशोत्सवात पूजन केले जाते. दरवर्षी गणेशोत्सवात विविध प्रकारच्या कला, चित्रे, माहितीपट यांचे प्रदर्शन करतात, व निरनिराळ्या कलेची माहिती देतात त्यामुळे लोकांमध्ये या कलेविषयी आदराची भावना वाढते. याकारणास्तव लोकांमध्ये उपवास व नामजपासोबत विविध कलेंच्या माध्यमातूनही श्री गणेश देवतेचे पूजन होते. म्हणून श्री गणेशांना या सर्व विद्या, कला यांचा अधिपती असे मानले जाते.

Leave a comment