यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ?

यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ?

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने बोलावलेल्या बैठकीमुळे यंदाच्या हंगामात उसाला महाराष्ट्रात किती दर मिळेल ? देशातील सर्वाधिक दर कोणत्या राज्यात ? हे लवकरच समजणार आहे. FRP Sugarcane – Year 2026-27- येत्या हंगामात उसाची एफआरपी वाढवन्यासाठीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.
२९ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने देशातील सर्व साखर उत्पादक राज्यांच्या साखर आयुक्तांची बैठक बोलावली आहे.
त्यामुळे येत्या हंगामात (हंगाम २०२६-२७) उसाची एफआरपी वाढवन्यासाठीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे.

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची बैठक-

यासंदर्भात केंद्रीय कृषी मूल्य आयोग देशातील साखर कारखानदारांच्या संघटनांशी ३० ऑक्टोबर २०२५ रोजी तर ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी शेतकरी संघटनांशी चर्चा करणार आहे.

केंद्र सरकारचा आदेश

केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी एक आदेश जारी केला होता. त्यामध्ये सरकारने असे म्हटले होते कि, २०२५-२६ च्या हंगामासाठी १०. २५ साखर उतारा असलेल्या उसाला प्रति टॅन ३५५० रुपये एफआरपी मिळणार आहे. तसेच त्या पुढील प्रत्येक टक्याला ३५५ रुपये ज्यादा मिळणार आहेत. या सर्व प्रक्रियेमध्ये केंद्रीय कृषी मूल्य आयोग महत्वाची भूमिका बजावत असतो. केंद्रीय कृषी मूल्य आयोग साखरेशी संबंधित सर्व साखर संघटना, शेतकरी संघटना व साखरेशी संबंधित इतर घटकांशी चर्चा करून एफआरपी वाढीची अथवा स्थिर ठेवण्याची शिफारस केंद्र सरकारला करत असतो.

या सर्व प्रक्रियेनंतर केंद्र सरकार निर्णय घेउन अध्यादेश जारी करत असते.

त्यामुळे येत्या २९ ऑक्टोबरपासून एफआरपी वाढवन्यासाठीची प्रक्रिया सुरु होत आहे.

हरयाणा सरकारचा निर्णय

तत्पूर्वी हरयाणा सरकारने उसाला प्रति टन ४१५० रुपये दर देणार अशी घोषणा करून राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी देशातील हा सर्वाधिक दर असल्याचे सांगितले आहे.

देशातील सर्वाधिक दर कोणत्या राज्यात ?

दरम्यान चालू उसाचा दर ४००० वरून ४१५९ तर उशिरा येणाऱ्या उसाचा दर ३९३० वरून ४०८० रुपये करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री सैनी यांनी केली आहे.