तुम्हाला माहिती आहे कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज कोण?
क्रिकेटच्या विश्वातील कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज, जो कसोटी फलंदाजांपैकी एक मानला जातो, जो राहुल द्रविडनंतर तिसऱ्या क्रमांकावरचा भरवशाचा खेळाडू होता. ज्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीची उच्च सरासरी आणि कौंटी क्रिकेटमधील एक विक्रम यांचा समावेश आहे. त्या फलंदाजाचे नाव चेतेश्वर पुजारा आहे. होय एक भारतीय फलंदाज आहे.
भारतीय क्रिकेट संघात चेतेश्वर पुजाराने २०१० मध्ये पदार्पण केले आणि एकूण १०३ कसोटी सामन्यांमधून ७१९५ धावा आपल्या खाती जोडल्या आहेत.
*चेतेश्वर पुजाराचे महत्वाचे विक्रम –
–कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारा भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आहे. फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजाराने एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचे अव्वल स्थान घेतले आहे. २०१७ मध्ये रांची येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात पुजाराने ५२५ चेंडूंमध्ये २०२ धावा केल्या होत्या त्याकरिता पुजाराला ६६८ मिनिटे लागली होती. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावामध्ये ५०० पेक्षा जास्त चेंडू खेळणारा तो एकमेव व पहिला भारतीय खेळाडू आहे.
* ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटममधील विक्रम –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये ५० पेक्षा जास्त फलंदाजीची सरासरी ने २००० धावा पूर्ण केल्या आहेत.
*बांगलादेशविरुद्धच्या सर्वाधिक धावा –
चेतेश्वर पुजाराने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला, ज्यात त्याने चंदू बोर्डे यांचा विक्रम मोडला, जो १४०४ धावांचा आणि एका हंगामात एका फलंदाजाचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम होता.
*कौंटी क्रिकेट मधील विक्रम –
चेतेश्वर पुजाराने कौंटी क्रिकेट मध्ये ११८ वर्षात प्रथमच एक असा विक्रम केला आहे, जो खूप महत्वाचा मानला जातो.
चेतेश्वर पुजाराने कौंटी क्रिकेटमध्ये (County Cricket ) ससेक्स (Sussex ) संघासाठी अनेक विक्रम केले आहेत ज्यात त्याने अनेकदा चांगली कामगिरी केली आहे.
कौंटी क्रिकेटमधील पुजाराचे विक्रम:
- द्विशतकातील विक्रम :
चेतेश्वर पुजारा एकाच कौंटी हंगामात तीन द्विशतकं करणारा ससेक्स संघाचा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
- भारतातील पहिला कसोटीपटू :
चेतेश्वर पुजारा लॉर्ड्स मैदानावर द्विशतक करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. हे द्विशतक त्याने ससेक्स संघाकडून खेळताना केले. यापूर्वी लॉर्ड्स मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विनू मंकड यांच्या नावावर होता. विनू मंकड यांनी इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळताना १८४ धावा ठोकल्या होत्या. व त्यानंतर दिलीप वेंगसकरांनी लॉर्ड्स मैदानावर सर्वोत्तम खेळी केली होती.जी त्यांनी इंग्लंडविरुद्ध खेळलेली होती. त्या सामन्यात वेंगसकरांनी १५७ धावा काढल्या होत्या पण कोणत्याच भारतीय क्रिकेटपटूला द्विशतक झळकावता आले नव्हते. मात्र हा पराक्रम चेतेश्वर पुजाराने केला आहे.
- आशियई खेळाडूंमधील सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू :
चेतेश्वर पुजारा इंग्लंडमधील देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आशियाई खेळाडू आहे. जो खेळ त्याने सरे विरुद्धच्या सामन्यात खेळला होता. ज्यामध्ये त्याने १९४ धावांची खेळी केली होती. या खेळीमध्ये त्याने कुमार संगकारा व जहीर अब्बास यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.