Devgad Hapus – वाशी मार्केट मध्ये देवगड हापूस ची पहिली पेटी दाखल फळांच्या राजाची बाजारात एन्ट्री .
Fruit Market Vaashi – देवगड हापूस ची पहिली पेटी वाशी मार्केट मधील बाजारात दाखल. यंदा दिवाळी पूर्वीच देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात रवाना. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कमालीचे उच्चाहाचे वातावरण झाले आहे.
Image
ऐन दिवाळीत देवगड हापूसची पहिली आवक बाजारात दाखल.
देवगड येथील एक आंबा बागायत दाराची हापूस आंब्याची पाच डझनाची पेटी एका खाजगी बसने वाशी मार्केट मध्ये सोमवारी पाठवली आहे. वेळेआधीच या वर्षीचा आंबा मुहूर्त झाला आहे. हि आंब्याची आवक देवगड तालुक्यातील पडवणे गावातून आली आहे. तसेच लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर हि पेटी मार्केट मध्ये दाखल झाली आहे.
ह्या वर्षी मे मधील अवकाळी पावसाला लागूनच यंदाचा पावसाळा चालू झाल्याने आंबा हंगाम वेळेआधीच गुंडाळावा लागला होता. त्यामुळे व्यापारी व ग्राहकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. परंतु आता मात्र ऑक्टोबरमध्येच देवगड हापूस मार्केट मध्ये दाखल झाला आहे.
हि आंब्याची आवक देवगड तालुक्यातील पडवणे गावातील एका आंबा बागायत दाराच्या कलम बागेत आली आहे. त्या फळबागायत दाराने त्या आंब्याच्या मोहोराची पावसापासून संरक्षण करून जोपासना केली. त्यामुळे त्याला चांगली फळ धारणा आली. त्यातीलच पाच डझन आंबे त्याने पेटीमधून वाशी फ्रुट मार्केट मध्ये एका खाजगी बसने रवाना केली आहे.
आंबा पेटीची विधिवत पूजा करून दिवाळी दिवशीच सोमवारी मुंबईला हापूस आंब्याची पेटी पाठवली आहे. ह्या वर्षीच्या दिवाळीतच फळबाजारात आंबा रवाना झाल्याने तसेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच त्याची विक्री होणार असल्याने सर्व फळ बागायत दरांमध्ये कुतूहलाचे वातावरण आहे.



